महोत्सवात सहभागी होण्याची पात्रता:

 1. प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाचे आयोजन १५ व १६ जानेवारी २०२२ या दिवशी करण्यात येणार आहे.
 2. या महोत्सवात केवळ मराठी चित्रपट कर त्यांनी मराठी भाषेत बनविलेले कथात्मक लघुपट स्वीकारले जातात. लघुपटाचे दिग्दर्शक लेखक गीतकार प्रमुख कलाकार निर्माता आहे मराठीच असले पाहिजे इतर तंत्रज्ञ मात्र गरजेनुसार मराठीत ते तर असू शकतात.
 3. पुढील विषयांवरील लघुपटांसाठी विशेष पुरस्कार देण्यात येतील:
  – सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, ऐतिहासिक महाराष्ट्राचा संदर्भ ठोसपणे पार्श्वभागी असणारा लघुपट
  – मराठी साहित्यकृतीवर आधारित लघुपट
  – मराठी नाट्यकृतीवर आधारित लघुपट
 4. फिल्म स्कूल्स आणि मास मिडिया इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांचे लघुपटही स्वीकारले जातील. या लघुपटांसाठी एक विशेष पुरस्कारही आहे.
 5. लघुपटाला इंग्रजीमध्ये सबटायटल्स असावी.
 6. लघुपटाची लांबी त्यातील सुरुवातीच्या व शेवटच्या नामावलीसह किमान ३ मिनिटे व जास्तीत जास्त ३० मिनिटे असावी.
 7. लघुपट फक्त कथात्मक शैलीतील असावेत. गैरकथात्मक / माहितीपट किंवा ॲनिमेशनपट स्वीकारले जाणार नाही.
 8. दिग्दर्शकाचे वय किमान १८ वर्षे असावे.
 9. ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर, यूट्यूब किंवा तशा वेबसाईट्सवर प्रेक्षकांना ऑनलाईन उपलब्ध असलेले लघुपट पात्र नसतील.
 10. प्रत्येक फिल्मसाठी ₹५०० प्रवेश फी आहे. ऑनलाइन प्रवेश अर्ज भरल्यानंतर लगेच ही फी भरावी.
 11. लघुपटामध्ये वापरलेली सर्व सामग्री (कन्टेंट / फुटेज) एकतर कलाकार / लघुपटकर्त्यांच्या मालकीचे असावे किंवा त्याची रीतसर परवानगी त्यांनी घेतलेली असणे आवश्यक आहे. इतर कोणाच्या मालकीची / हक्काची सामग्री (कंटेंट / फुटेज) लघुपटामध्ये वापरली असल्यास त्याची परवानगी असणे आवश्यक आहे आणि त्याची एक प्रत महोत्सव संयोजकांना जमा करावी.
 12. एक अर्जदार किंवा फिल्ममेकर एकाहून जास्त लघुपट या महोत्सवास पाठवू शकतो. पण प्रत्येक लघुपटासाठी वेगळा प्रवेश अर्ज व प्रवेश फी भरावी.
 13. महोत्सव १५ व १६ जानेवारी २०२२ या दिवशी मुंबई शहरात आयोजित करण्यात येईल, आणि तो थिएटर्समध्ये किंवा ऑनलाइन स्वरूपात होईल. ऑनलाइन स्वरूपात महोत्सवात निवडलेल्या लघुपटांची ठराविक प्रेक्षकांसाठी प्रायव्हेट व्यूईंगकरिता स्क्रिनिंग करण्यात येईल.

अन्य महत्वाचे नियम

 1. अर्जदारांनी महोत्सवाकडे समाविष्ट केलेल्या फिल्म, फिल्म संबंधी इतर सामग्री आयोजकांकडे संग्रही राहील व त्याचा महोत्सवाच्या जाहिरात, प्रसारण व इतर अव्यावसायिक कामांसाठी करण्यात येईल. कोणत्याही लघुपटाचा व्यावसायिक तत्त्वावर वापर आयोजकांतर्फे करण्यात येणार नाही.
 2. महोत्सवात निवांत निवड करण्यात आलेल्या चित्रपटांना नंतर महोत्सवातून माघार घेता येणार नाही.
 3. महोत्सवाचे परीक्षक तज्ञ व प्रोग्रमस यांचे लघुपट चित्रपटांच्या निवड पुरस व बक्षिसांचा बंदीचे निर्णय अंतिम व सर्वांना बंधनकारक असतील.
 4. या महोत्सवाच्या नियमांमध्ये बदल करण्याचा किंवा तो रद्द करण्याचा किंवा नवीन तयार करण्याचा हक्क पूर्णपणे महोत्सव संचालक यांचा असेल.
 5. या नियमावलीमध्ये समावेश नसलेल्या कोणत्याही गोष्टीचा निवाडा महोत्सव संचालक करतील व त्यांचा निर्णय अंतिम असेल.