स. न.
प्रबोधन गोरेगाव यंदा सुवर्ण महोत्सव साजरा करीत आहे. यानिमित्ताने आजवरच्या वाटचालीला साजेसे आणि पुढल्या वळणावरचे काही नवीन उपक्रम राबविण्यात येणार आहेत. सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य तसेच कला, क्रीडा या क्षेत्रात प्रबोधनने गेल्या पन्नास वर्षात भरीव कामगिरी केली आहे, हे अतिशय अभिमानाने आणि नम्रपणे आम्ही इथे नमूद करतो. केवळ राज्यच नव्हे तर देश पातळीवर प्रबोधन गोरेगावच्या कामाची नोंद घेण्यात आली आहे. प्रबोधन गोरेगावचे अध्यक्ष मा. श्री. सुभाष देसाई साहेब, सन्माननीय उद्योग मंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन आणि नेतृत्व यातूनच ही वाटचाल घडून आली. त्यांच्याच संकल्पनेतून प्रबोधन गोरेगाव सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त अनेक नवे उपक्रम राबविणार आहे.
प्रबोधन गोरेगावने आजवर नाटक तसेच अनेक कलाविषयक कार्यक्रम सातत्याने केले आहेत. हीच परंपरा पुढे नेत आता प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघूपट महोत्सव याचं आयोजन करण्यात येत आहे. जगभरच्या मराठी कलावंतांसाठी, त्यांच्या लघूपटांसाठी हे एक जागतिक व्यासपीठ असणार आहे. केवळ मराठी कलावंतांनी केलेल्या मराठी लघूपटांसाठी हा एक स्वतंत्र आंतरराष्ट्रीय महोत्सव असणार आहे. याचे आयोजन करण्यासाठी ख्यातकीर्त चित्रपट अभ्यासक आणि आंतरराष्ट्रीय महोत्सवांचे जाणकार श्री. अशोक राणे महोत्सव संचालक म्हणून लाभले आहेत. या महोत्सवाच्या वेबसाईटचे अनावरण करून महोत्सवाची अधिकृत घोषणा उद्या रविवार दि. २६ सप्टेंबर २०२१ महोत्सवाचे अध्यक्ष मा. श्री. सुभाष देसाई करणार आहेत. या कार्यक्रमासाठी आपण आपला प्रतिनिधी आणि छायाचित्रकार अवश्य पाठवावा, ही विनंती. सोबत कार्यक्रम पत्रिका आहे.
धन्यवाद,
प्रबोधन गोरेगाव