झेवियर्स इन्स्टिट्यूट्स ऑफ कम्युनिकेशन्स मधून पदवी प्राप्त केल्यानंतर, मोनालिसा यांनी इक्विनॉक्स फिल्म्समधे सुमंत्रा घोसाल आणि राम माधवानी यांच्या सहाय्यक म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली. अनेक टिव्ही जाहिरातींसाठी काम केल्यानंतर त्यांनी कास्टिंग डायरेक्ट आणि प्रोडक्शन डिझायनर म्हणून स्वतंत्रपणे कामाला सुरुवात केली.
२००७ मधे पती बौद्धायन यांच्यासोबत मोनालिसा यांनी लिट्ल लॅम्ब फिल्म्सची स्थापना केली. त्यांच्या जाहिरातींना कान्स, वन शो, स्पाईक्स, एफ्फिज, गोवाफेस्ट अशा अनेक स्पर्धांमधे पुरस्कारही मिळाले. लिट्ल लॅम्ब फिल्म्सच्या तीनकहोन (२०१४), द वायोलिन प्लेयर (२०१६) आणि द क्लाऊड अँड द मॅन (२०२१) या ३ फीचर फिल्म्सच्या त्या निर्माता व प्रोडक्शन डिजाईनर आहेत.
शॉट्स – एशियापॅसिफिक २०२१ आणि राष्ट्रीय फिल्म पुरस्कार २०१९ साठी मोनालिसा यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले आहे. ‘किसके लिए‘ या पुरस्कार विजेत्या लघुमाहितीपटाचे त्यांनी दिग्दर्शन केले आहे आणि सध्या त्यांच्या पहिल्या फीचर फिल्मच्या स्क्रीप्टवर काम करत आहेत.