आपण प्रवेश अर्ज सबमिट करण्यापूर्वी, कृपया खालील दिलेले वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ) नीट समजून घ्या.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
प्रवेश शुल्क किती आहे?
प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवासाठी प्रवेश शुल्क ₹५०० प्रति लघुपट आहे.
सबमिशनची अंतिम तारीख कधी आहे (अंतिम मुदत)?
अंतिम तारीख किंवा अंतिम मुदत २० डिसेंबर, २०२१ आहे.
लघुपटांसाठी पात्रता निकष काय आहे?
कृपया प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवासाठी पात्रता पूर्ण समजून घेण्यासाठी आमचे नियम आणि अटी येथे वाचा.
मी माझा लघुपट कसा सबमिट करू?
प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवासाठी प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे. तुम्हाला तुमची शॉर्ट फिल्म YouTube, Vimeo, Google Drive, Dropbox, इत्यादी सेवांवर ऑनलाइन अपलोड करावी लागेल – जिथे जिथे ती ऑनलाइन पाहता येईल. त्यानंतर, प्रवेश अर्ज असलेल्या या पृष्ठाला भेट द्या आणि तो भरा.
मी प्रवेश शुल्कासाठी पैसे कसे भरावे?
प्रवेश शुल्क कोणत्याही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, यूपीआय किंवा पेमेंट वॉलेटचा वापर करून केवळ ऑनलाइन भरता येईल.