प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव २०२२ साठी लघुपटांच्या अधिकृत निवडीची घोषणा

मुंबई: १९७२ साली स्थापना झालेल्या आणि मुंबई व महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आरोग्य, खेळ आदी क्षेत्रात जाणीवतेने कार्य करणार्‍या ‘प्रबोधन गोरेगाव‘ संस्थेद्वारे सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. लघुपट करणार्‍या, करू इच्छिणार्‍या जगभरातील मराठी कलावंतांसाठी एक भरभक्कम व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन लघुपटांच्या निर्मितीसोबत त्यांचे मार्केटिंग आणि…