PISFF चा परिचय
मुंबई व महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आरोग्य, खेळ आदी क्षेत्रात जाणीवतेने कार्य करत आलेली ‘प्रबोधन गोरेगाव‘ ही मुंबईच्या पश्र्चिम उपनगरातली आमची संस्था यंदा ५० व्या वर्षात पदार्पण करत आहे. यानिमित्ताने, आजवरच्या लौकिकाला साजेसे काही वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम सुवर्ण महोत्सवी वर्षात हाती घेण्याचे संस्थेने ठरविले आहे. हे उपक्रम केवळ मुंबई- महाराष्ट्रापुरतेच मर्यादित न ठेवता देशातील तसेच जगभरच्या मराठी कलावंतांपर्यंत नेण्याचा महत्वाकांक्षी संकल्प संस्थेने योजिला आहे. या उपक्रमांपैकी एक म्हणजे, प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव.
लघुपट करणाऱ्या, करू इच्छिणाऱ्या देशातल्या आणि जगभरच्या मराठी कलावंतांसाठी एक भरभक्कम व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा प्रमुख हेतू आहे. याबरोबरच लघुपटांची निर्मिती तसेच त्यांचे मार्केटिंग आणि विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातला सहभाग याचेही मार्गदर्शन देऊन मराठी लघुपट यांचे दालन अधिक समृद्ध करावे असाही मनसुबा आहे.
श्री. सुभाष देसाई
Prabodhan International Short Film Festival