लघुपटांचे स्क्रीनिंग आणि पुरस्कार सोहळा

— १४ जानेवारी, २०२२ – ११ वाजल्यापासून —

ठिकाण:

मिनी थिएटर (३ रा मजला), पु.ल. देशपांडे कला अकादमी, दादर, मुंबई

लघुपटांच्या स्क्रीनिंगचे वेळापत्रक

सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत
PISFF 2022 Schedule

पुरस्कार सोहळा

५:३० वाजल्यापासून

—————

The Awards Ceremony of the Prabodhan International Short Film Festival 2022 will be streamed LIVE on our Facebook Page @ https://www.facebook.com/prabodhanisff

—————

प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव

PISFF चा परिचय

Prabodhan International Short Film Festival

१९७२ साली स्थापन झालेल्या ‘प्रबोधन गोरेगाव’, या सामाजिक-सांस्कृतिक संस्थेच्या वतीने प्रथमच प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.

मुंबई व महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आरोग्य, खेळ आदी क्षेत्रात जाणीवतेने कार्य करत आलेली ‘प्रबोधन गोरेगाव‘ ही मुंबईच्या पश्र्चिम उपनगरातली आमची संस्था यंदा ५० व्या वर्षात पदार्पण करत आहे. यानिमित्ताने, आजवरच्या लौकिकाला साजेसे काही वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम सुवर्ण महोत्सवी वर्षात हाती घेण्याचे संस्थेने ठरविले आहे. हे उपक्रम केवळ मुंबई- महाराष्ट्रापुरतेच मर्यादित न ठेवता देशातील तसेच जगभरच्या मराठी कलावंतांपर्यंत नेण्याचा महत्वाकांक्षी संकल्प संस्थेने योजिला आहे. या उपक्रमांपैकी एक म्हणजे, प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव.

लघुपट करणाऱ्या, करू इच्छिणाऱ्या देशातल्या आणि जगभरच्या मराठी कलावंतांसाठी एक भरभक्कम व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा प्रमुख हेतू आहे. याबरोबरच लघुपटांची निर्मिती तसेच त्यांचे मार्केटिंग आणि विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातला सहभाग याचेही मार्गदर्शन देऊन मराठी लघुपट यांचे दालन अधिक समृद्ध करावे असाही मनसुबा आहे.

पुरस्कार व बक्षिसे

सर्वोत्कृष्ट लघुपट पुरस्कार

सर्वोत्कृष्ट लघुपट - प्रथम पुरस्कार

रोख पारितोषिक ₹७५,०००, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र
(रोख रक्कम दिग्दर्शक आणि निर्माते यांच्यात समान विभागून देण्यात यईल)

सर्वोत्कृष्ट लघुपट - द्वितीय पुरस्कार

रोख पारितोषिक ₹५०,०००, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र
(रोख रक्कम दिग्दर्शक आणि निर्माते यांच्यात समान विभागून देण्यात यईल)

सर्वोत्कृष्ट लघुपट - तृतीय पुरस्कार

रोख पारितोषिक ₹२५,०००, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र
(रोख रक्कम दिग्दर्शक आणि निर्माते यांच्यात समान विभागून देण्यात यईल)

विशेष पुरस्कार

विशेष पुरस्कार

विशेष पुरस्कार – सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, ऐतिहासिक माहाराष्ट्राचा ठोस संदर्भ पार्श्वभागी असणाऱ्या विषयावरील सर्वोत्कृष्ट लघुपट

रोख पारितोषिक ₹२५,०००, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र

विशेष पुरस्कार

विशेष पुरस्कार – मराठी नाट्यकृतीवर आधारित सर्वोत्कृष्ट लघुपट

रोख पारितोषिक ₹२५,०००, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र

विशेष पुरस्कार

विशेष पुरस्कार – मराठी साहित्यकृतीवर आधारित सर्वोत्कृष्ट लघुपट

रोख पारितोषिक ₹२५,०००, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र

विशेष पुरस्कार

विशेष पुरस्कार – फिल्म स्कूल किंवा मास मिडिया इन्स्टिट्यूट्समध्ये फिल्ममेकिंगचे प्रशिक्षण घेणाऱ्या दिग्दर्शकांपैकी सर्वोत्कृष्ट लघुपट

रोख पारितोषिक ₹२५,०००, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र

वैयक्तिक पुरस्कार

सर्वोत्कृष्ट पटकथालेखक

रोख पारितोषिक ₹१०,०००, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र

सर्वोत्कृष्ट छायाचित्रकार

रोख पारितोषिक ₹१०,०००, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र

सर्वोत्कृष्ट संकलक

रोख पारितोषिक ₹१०,०००, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र

सर्वोत्कृष्ट अभिनेता

रोख पारितोषिक ₹१०,०००, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

रोख पारितोषिक ₹१०,०००, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र
Subhash Desai

जगभरच्या सिनेप्रेमी मराठी कलावंतांसाठी जागतिक व्यासपीठ म्हणजे प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव – प्रबोधन गोरेगावच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त एक दमदार पुढचं पाऊल!

सुभाष देसाई
अध्यक्ष, प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव, मुंबई

मराठी सुह्रुदांनो चला साजरा करूया सिनेमाचा उत्सव प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात आपल्या लघुपटांसह.

अशोक राणे
फेस्टिवल डायरेक्टर, प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव

Ashok Rane